Aabha card :- आभा कार्ड काडून घ्या अगदी 2 मिनिटा मध्ये
मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ABHA Health Card mahiti Marathi म्हणजे काय असते ‘आभा’ हेल्थ कार्ड याचा नेमका काय होतो फायदा आणि कस काडायच? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहींना काही योजना आणत असतात त्या पैके च हे एक योजना आहे चला तर मग बघूया या आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असते. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतो.
मित्रांनो आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.ते माहिती आपण कधी पण पाहू शकतो मोबाइल वर
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.
म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. चला तर आज जाणून घेवूया, आभा हेल्थ कार्ड नेमकं काय असते. त्याचा काय फायदा होतो, ते कसे मिळवायचे, ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवता येईल.
- आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
सुकन्या समृद्धि योजना 2023 मराठी माहिती more 👇 👉 https://storiesaboutvillage.blogspot.com/2023/07/%20%20%202023%20%20.html
![]() | ||
|
ABHA हेल्थ कार्डचे हे आहेत फायदे पुढील प्रमाणे
- तुमच्या मेडिकल स्लिप्स, रिपोर्ट्स इत्यादी गहाळ होण्याची भीती राहणार नाही. तुम्ही सहजपणे तुमचे रेकॉर्ड ऑनलाइन ठेवू शकाल.
- तुम्ही नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यास, तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही.
- तुमचा रक्तगट कोणता आहे, तुम्हाला कोणता आजार झाला आहे, सोबत तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेला होता. ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल.
- आभा हेल्थ कार्ड विमा कंपन्यांशी जोडले गेले आहे. ज्याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणे देखील सोपे होईल.
- तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि प्रयोगशाळेतील अहवालांची माहिती आभा कार्डमध्ये राहील.
- ऑनलाइन उपचार घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल, ते आभा कार्ड दाखवून ऑनलाइन डॉक्टरांना सर्व माहिती सहज देऊ शकतात.
तुम्ही घरबसल्या बनवू शकता आभा
हेल्थ कार्ड
- यासाठी सगळ्यात आधीhttps://healthid.ndhm.gov.in/register असं सर्च करा
- त्यानंतर 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
- इथल्या Make ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.
- इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
- आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे.
- तशी सूचना इथं दिलेली असेल. मग next या पर्यायावर जा.
- सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.
- सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग नेक्स्टवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून पुढे जा.
- पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल.
- Aadhaar Confirmation Effective झाल्याचीही सूचना तिथे येईल. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मग next वर क्लिक करायचं आहे.
- तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेसही आभा क्रमांकाशी जोडू शकता.
- आता स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Connect ABHA Address या रकान्यात क्लिक करा.
- इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Subtleties दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे.
- खालच्या रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा अॅड्रेस तयार करू शकता. हे टाकून झालं की make and connection या रकान्यात क्लिक करा.
- तुमचा आभा नंबर आभा अॅड्रेस लिंक झाल्याचा मेसेज स्क्रिनवर येईल.
टीप :- सदरच्या नेट कॅफी मध्ये जाऊन फॉर्म भरून घेणे व माहिती घेणे
धन्यवाद 👍
0 टिप्पण्या